वाढणी: ३ माणसांसाठी
वेळ: १/२ तास
१/२ कप शेवया
४ कप दूध
१/२ कप साखर
१ टीस्पून तूप
१ टेस्पून वेलची पूड
२ टेस्पून बदाम व पिस्त्याचे पातळ काप
कृती:
- बदाम २ तास आधी पाण्यात भिजवून त्याची साले काढून पातळ काप करून घ्यावेत. पिस्त्याचे काप करून घ्यावेत.
- कढई गरम करून त्यात तूप घालावे. पातळ झाले की त्यात शेवया गुलाबी रंगाच्या होईपर्यंत भाजून बाजूला काढून ठेवाव्यात.
- त्याच कढईमध्ये दूध गरम करून उकळी आल्यावर त्यात भाजलेल्या शेवया, साखर आणि वेलचीपूड घालावी.
- मध्यम आचेवर झाकण ठेवून शेवया शिजू दयाव्या. मध्येमध्ये झाकण काढून ढवळावे.
- दूध चांगले आटले व शेवया व्यवस्थित शिजल्या की गॅस बंद करून थंड करण्यास ठेवावी.
- बदाम पिस्त्याचे काप घालून सजवावे व थंडगार सर्व्ह करावी.


0 comments:
Post a Comment