वाढणी: २ जणांसाठी
वेळ: १ तास
१/४ किलो सोललेली कोलंबी
रश्श्यासाठी:
१ मध्यम बारीक कापलेला कांदा
१/२ टीस्पून हळद
१ टेबलस्पून लाल तिखट
६ टेस्पून पाण्यात भिजवलेले ३ कोकम
मीठ
वाटणासाठी:
१ मध्यम कापलेला कांदा
१/४ कप किसलेले सुके खोबरे
४-५ लवंगा
१ इंच दालचिनीचा तुकडा
१ टेबलस्पून धणे
२-३ लसूण पाकळ्या
२ वेलदोडे
१ टीस्पून बडीशेप
१ कप पाणी
तेल
कृती:
- प्रत्येक कोलंबीचा धागा काढून थोडासा मीठ आणि पाण्याने नीट धुवून घ्या.
- कढईमध्ये २ चमचे तेल गरम करून त्यात कांदा २-३ मिनिटांसाठी परतून घ्या.
- मग त्यात लवंगा, दालचिनी, धणे, लसूण, वेलदोडे व बडीशेप घालून कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या.
- सुके खोबरे घालून ते ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या.
- गॅस बंद करून मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून दयावे.
- थंड झाल्यावर १/२ कप पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट वाटून घ्यावी.
- कढईमध्ये २ चमचे तेल गरम करून त्यात बारीक कापलेला कांदा पारदर्शक होईपर्यंत परतून घ्या .
- नंतर त्यात हळद, लाल तिखट, पेस्ट आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
- ५ मिनिटांनी, १/२ कप पाणी घालून मिश्रणाला उकळी आणा.
- कोलंबी व कोकमाचे पाणी घालून झाकण ठेवून ७-८ मिनिटे शिजवा.
- कोलंबी मसाला तयार आहे.
- पोळी किंवा भाताबरोबर सर्व्ह करा.


0 comments:
Post a Comment