वाढणी: २ माणसांसाठी
वेळ: १ तास (र्मरीनेशनचा वेळ पकडून)
१/४ किलो सोललेली कोलंबी
५ टेबलस्पून तांदळाचे पीठ
तेल
र्मरीनेशनसाठी:
१ टेबलस्पून आले लसूण पेस्ट
१ टेबलस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
२ थेंब लिंबाचा रस
मीठ
कृती:
- प्रत्येक कोलंबीचा धागा काढून थोडस मीठ आणि पाण्याने नीट धुवून घ्या.
- कोलंबीला आले लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, लिंबाचा रस व मीठ लावून १/२ तास र्मरीनेट करत ठेवावे.
- प्रत्येक कोलंबी तांदळाच्या पीठात घोळवून घ्यावी.
- कढईमध्ये तेल तापवून त्यात कोलंबी डीप फ्राय करून घ्यावी.
- दोन्ही बाजूंनी खरपूस तळल्यावर गरमगरम सर्व्ह करा.


0 comments:
Post a Comment