वाढणी: २ माणसांसाठी
वेळ: १/२ तास
साहित्य:
१ कप भिजवलेले काबुली चणे
१ मध्यम बारीक कापलेला कांदा
१ टेबलस्पून आले लसूण पेस्ट
२ टेबलस्पून कॉर्न फ़्लॊर
२ हिरव्या मिरच्या
१ टीस्पून धणे जिरे पावडर
१ टीस्पून आमचूर पावडर
२ टेबलस्पून कापलेली कोथिंबीर
२ टेबलस्पून कापलेली कोथिंबीर
२ थेंब लिंबाचा रस
ब्रेंड क्रम्प्स किंवा रवा
ब्रेंड क्रम्प्स किंवा रवा
मीठ
पाणी
- प्रथम मिक्सरमध्ये भिजवलेले चणे, आले लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, धणे जिरे पावडर व आमचूर पावडर घालून भरडसर वाटून घ्यावे.
- नंतर त्या मिश्रणात कॉर्नफ्लोर, कांदा, कोथिंबीर, लिंबाचा रस, मीठ व भिजवण्यापुरते पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यावे.
- मिश्रणाचे छोटे चपटे गोळे करून ब्रेंड क्रम्प्स किंवा रव्यात घोळवून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शॅलॊ फ्राय करावे.
- गरमगरम खुसखुशीत कटलेट टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा.


0 comments:
Post a Comment