वाढणी: २ माणसांसाठी
वेळ: १ तास
८ लादी पाव
कटासाठी:
१/४ कप मटकी
१ मध्यम बारीक कापलेला कांदा
१ छोटा बारीक कापलेला टोमॅटो
३-४ लसूण पाकळ्या
१ इंच आल्याचा तुकडा
२-३ काळी मिरी
१ इंच दालचिनीचा तुकडा
२-३ लवंगा
१ तमालपत्र
१ टेबलस्पून जिरे
१ टेबलस्पून धणे
१/४ कप किसलेले सुके खोबरे
१/२ कप पाणी
मीठ
तेल मीठ
फोडणीसाठी:
१ टीस्पून हळद
१ चुटकी हिंग
१ टेबलस्पून गरम मसाला
४ टेबलस्पून लाल तिखट
सजावटीसाठी:
१/२ कप फरसाण
बारीक कापलेला कांदा
लिंबू
कृती:
- मटकी रात्रभर पाण्यात भिजत घालावी.
- सकाळी त्यातील पाणी काढून टाकून सुती कापडामध्ये गुंडाळावे. बारीक खडे किंवा कडक मटकी असेल तर निवडून काढून टाकावी. घट्ट गाठ बांधून किमान ८ तास ठेवून दयावी.
- मोड आलेली मटकी कुकरमध्ये २ शिट्ट्या करून शिजवून घ्यावी.
- मिक्सरमध्ये लसूण, आले, काळी मिरी, दालचिनी, लवंगा, तमालपत्र, जिरे व धणे घालून एकत्र वाटून घ्यावे.
- आता कढईमध्ये ४-५ चमचे तेल गरम करून पेस्ट छान परतून घ्यावी.
- मसाल्याचा छान वास सुटला की त्यात कापलेला कांदा व टोमॅटो घालून मिश्रण एकजीव होईपर्यंत परतावे.
- नंतर किसलेले खोबरे घालून परतावे.
- मिश्रणाला तेल सुटायला लागले की गॅस बंद करून मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून दयावे.
- थंड झाल्यावर १ कप पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट वाटून घ्यावी.
- कढईमध्ये ४-५ चमचे तेल गरम करा.
- त्यात हळद, हिंग, गरम मसाला आणि लाल तिखट टाकून फोडणी दया.
- मग पेस्ट आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
- उकडलेली मटकी आणि १/२ कप पाणी घालून मिश्रणाला उकळी आणा.
- मिसळ तयार आहे.
- प्लेटमध्ये प्रथम मटकी, मग फरसाण, कट, बारीक कापलेला कांदा आणि शेवटी लिंबाची फोड वाढा.
- लादीपावाबरोबर गरमगरम सर्व्ह करा.


0 comments:
Post a Comment