चिकन कलेजी फ्राय

Friday, 2 August 2013



वाढणी: २ माणसांसाठी 
वेळ: ४५ मिनीटे (र्मरीनेशनचा वेळ पकडून)



साहित्य:
१/४ किलो चिकन कलेजी 
तेल 

र्मरीनेशनसाठी:  
१ टेबलस्पून लाल तिखट  
१/२ टीस्पून हळद
२ थेंब लिंबाचा रस
मीठ

कृती:
  1. कलेजी पाण्याने नीट धुवून घ्या व आवडीप्रमाणे त्याचे तुकडे करून घ्यावे.   
  2. सर्व तुकड्यांना लाल तिखट, हळद, लिंबाचा रस व मीठ लावून १/२ तास र्मरीनेट करत ठेवावे. 
  3. कढईमध्ये तेल तापवून त्यात कलेजी डीप फ्राय करून घ्यावी.
  4. दोन्ही बाजूंनी खरपूस तळल्यावर गरमगरम सर्व्ह करा.

0 comments:

Post a Comment

Food on my Mind Copyright © 2009 Designed by Ipietoon Blogger Template for Bie Blogger Template Vector by DaPino