वाढणी: ४ माणसांसाठी
वेळ: ४ तास (र्मरीनेशनचा वेळ पकडून)
१ किलो गोदरेज रिअल गुड चिकन
५-६ लवंगा
४-५ काळी मिरीचे दाणे
१ इंच दालचिनीचा तुकडा
४ वेलदोडे
३-४ तेजपत्त्याची पाने
१ टीस्पून आले लसूण पेस्ट
१ टीस्पून एव्हरेस्ट चिकन मसाला
४ टेबलस्पून तूप
मिरची पेस्टसाठी:
१५ सुक्या लाल मिरच्या
२ टीस्पून धणे
८ लसूण पाकळ्या
१/४ कप पाणी
र्मरीनेशनसाठी:
४ टीस्पून दही
१ कांद्याची पेस्ट
१ टीस्पून हळद
१ टेबलस्पून लाल तिखट
२ थेंब लिंबाचा रस
मीठ
सजावटीसाठी:
बारीक कापलेली कोथिंबीर
कृती:
- १/४ कप पाण्यात १० मिरच्या तासभर भिजत ठेवाव्या.
- नंतर त्यात धणे व लसूण पाकळ्या घालून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट वाटून घ्यावी.
- दह्यामध्ये २ टेबलस्पून कांद्याची पेस्ट, १/२ टीस्पून हळद, १/२ टेबलस्पून लाल तिखट, लिंबाचा रस, मिरच्यांची पेस्ट व चवीप्रमाणे मीठ घालून त्यात चिकन २ तास र्मरीनेट करत ठेवावे. १ टीस्पून मिरच्यांची पेस्ट बाजूला ठेवून दयावी.
- कढईमध्ये तूप गरम करून त्यात लवंगा, काळी मिरीचे दाणे, दालचिनी, वेलदोडे व तेजपत्त्याची पाने घालून छान परतून घ्यावे.
- मसाल्याचा छान वास सुटला की त्यात उरलेली कांद्याची पेस्ट घालून परतावे.
- नंतर त्यात ५ अख्ख्या मिरच्या, आले लसूण पेस्ट, १/२ टीस्पून हळद, १/२ टेबलस्पून लाल तिखट, एव्हरेस्ट चिकन मसाला व १ टीस्पून मिरच्यांची पेस्ट घालून तूप सुटेपर्यंत परतावे.
- त्यात र्मरीनेट केलेले चिकनचे तुकडे टाकून व्यवस्थित वर खाली परतून घ्यावे.
- झाकण ठेवून मध्यम आचेवर चिकन १५-२० मिनिटे शिजू दयावे.
- उरलेले र्मरीनेशनचे मिश्रण, चवीप्रमाणे मीठ व १ कप पाणी घालून मिश्रणाला उकळी आणावी.
- चिकन झटका तयार आहे.
- कोथिंबीर घालून पोळी किंवा भाताबरोबर सर्व्ह करा.


1 comments:
mnmbnvnbb
Post a Comment